Blog Post

AIAWU > News > Press release > कॉम्रेड कुमार शिराळकर यांचा प्रथम स्मृतिदिन सोहळा

कॉम्रेड कुमार शिराळकर यांचा प्रथम स्मृतिदिन सोहळा

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) नांदेड जिल्हा समितीच्या वतीने शेतमजूर नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जीवनदानी कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त “शेतमजूर वर्गासमोरील आव्हाने” या विषयावर कॉ. कुमार स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते म्हणून अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे केंद्रीय सहसचिव कॉ. विक्रम सिंग होते तर राज्यउपाध्यक्ष कॉ. सय्यद रज्जाक यांची विशेष उपस्थिती होती. शेतमजूर वर्गासमोरील आव्हानांवर चिंतन करीत व त्याप्रमाणे भावी कार्य आखीत कॉ. कुमार यांना क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.

आज मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. या गावात महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन (लाल बावटा) नांदेड जिल्हा समितीच्या वतीने कॉम्रेड कुमार शिराळकर प्रथम स्मृतिव्यख्यान आयोजित केले होते. क्रर्यक्रमाचे अध्यक्ष शेतमजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अंकुश आंबूलगेकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड मंजुश्री कबाडे यांनी केले, तर संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष कॉ.विनोद गोविंदवार यांनी कॉम्रेड कुमार शिराळकर यांची आठवण करत त्यांचे जीवनच एक क्रांतिकारी आंदोलन होते हे अधोरेखित केले. तसेच आज राज्य व केंद्र सरकारचे धोरणे कशी शेतमजुरांच्या विरोधात आहेत हे मजुरांना समजावून सांगितले.अखिल भारतीय शेतमजूर युनियन चे राष्ट्रीय सहसचिव कॉ.विक्रम सिंग यांनी, कॉम्रेड कुमार शरीराने अपल्यासोबत नाहीत परंतु त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत व आपण जेव्हा कष्टकऱ्यांच्या अधिकारासाठी संघर्ष करू त्या संघर्षात कॉम्रेड कुमार आपल्यासोबत असतील. केंद्र सरकार मजुरांच्या बाबतीत कशी चुकीची धोरणे घेत आहे,भांडवलदार वर्गाला करामध्ये लाखो कोटीची सुट देतात व दुसऱ्याबाजूला जनतेच्या हक्काचे विविध खात्यांचे बजेट वरचेवर कमी कमी करत आहेत. त्याचा सगळ्यात वाईट परिणाम हा शेतमजुर वर्गावर होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे जातीची धर्माची ओळख विसरून शेतमजूर वर्गाची एकजूट भक्कम करवी लागेल. शेतमजुर, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांना आर्थिक व सामाजिक समानतेची लढाई बरोबरीने करावी लागेल असे ते म्हणाले. समानतेसाठीच्या संघर्षाची गरज व महत्व सांगत असतांनाच या सर्वांना महिलांच्या समानतेची लढाई देखील याच लढाईचा अभिन्न भाग आहे आणि ही लढाई व्यवस्थेसोबत तसेच स्वतःबरोबरही आहे असे ते म्हणाले. कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे क्रांतिकारी काम नेटाने पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.सय्यद रझाक यांनी मांडताना आपले अनुभव सांगितले व संघटना मजबूत करा असे मत मांडले. सदर कार्यक्रमासाठी देगलूर आणि मुखेड तालुक्यातील मजूर सहभागी झाले होते. यावेळी मंचावर या मान्यवरांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉ.बालाजी कलेटवाड,संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माधव देशटवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप कॉ.अंकुश अंबुलगेकर यांनी केला. शेवटी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतमजूर युनिनच्या अंबुलगा गाव कमिटीचे कॉ.पंढरी देशटवाड, कॉ. पार्वती माळी, कॉ. रामराव यामावाड, शिवाजी मंत्रे, कॉ.आमिर कुरेशी, कॉ. विठ्ठल पांढरे, प्रदीप गुळवे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी संघटना SFI युवक संघटना DYFI चे कार्यकर्ते कॉ. शंकर बादावाड, कॉ.गंगाधर मांजरमे, कॉ. सुधाकर कांबळे, कॉ. हरीश देशटवाड, कॉ. माधव बादावाड, , कॉ.भीमराव सोनकांबळे, कॉ. शंकर येरगे, आदिनाथ कापसे यांच्यासह आनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. शेतमजूर युनियनच्या जिल्हा समितीच्या वतीने या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.’

आज मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. या गावात महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन (लाल बावटा) नांदेड जिल्हा समितीच्या वतीने कॉम्रेड कुमार शिराळकर प्रथम स्मृतिव्यख्यान आयोजित केले होते. क्रर्यक्रमाचे अध्यक्ष शेतमजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अंकुश आंबूलगेकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड मंजुश्री कबाडे यांनी केले, तर संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष कॉ.विनोद गोविंदवार यांनी कॉम्रेड कुमार शिराळकर यांची आठवण करत त्यांचे जीवनच एक क्रांतिकारी आंदोलन होते हे अधोरेखित केले. तसेच आज राज्य व केंद्र सरकारचे धोरणे कशी शेतमजुरांच्या विरोधात आहेत हे मजुरांना समजावून सांगितले.अखिल भारतीय शेतमजूर युनियन चे राष्ट्रीय सहसचिव कॉ.विक्रम सिंग यांनी, कॉम्रेड कुमार शरीराने अपल्यासोबत नाहीत परंतु त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत व आपण जेव्हा कष्टकऱ्यांच्या अधिकारासाठी संघर्ष करू त्या संघर्षात कॉम्रेड कुमार आपल्यासोबत असतील. केंद्र सरकार मजुरांच्या बाबतीत कशी चुकीची धोरणे घेत आहे,भांडवलदार वर्गाला करामध्ये लाखो कोटीची सुट देतात व दुसऱ्याबाजूला जनतेच्या हक्काचे विविध खात्यांचे बजेट वरचेवर कमी कमी करत आहेत. त्याचा सगळ्यात वाईट परिणाम हा शेतमजुर वर्गावर होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे जातीची धर्माची ओळख विसरून शेतमजूर वर्गाची एकजूट भक्कम करवी लागेल. शेतमजुर, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांना आर्थिक व सामाजिक समानतेची लढाई बरोबरीने करावी लागेल असे ते म्हणाले. समानतेसाठीच्या संघर्षाची गरज व महत्व सांगत असतांनाच या सर्वांना महिलांच्या समानतेची लढाई देखील याच लढाईचा अभिन्न भाग आहे आणि ही लढाई व्यवस्थेसोबत तसेच स्वतःबरोबरही आहे असे ते म्हणाले. कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे क्रांतिकारी काम नेटाने पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.सय्यद रझाक यांनी मांडताना आपले अनुभव सांगितले व संघटना मजबूत करा असे मत मांडले. सदर कार्यक्रमासाठी देगलूर आणि मुखेड तालुक्यातील मजूर सहभागी झाले होते. यावेळी मंचावर या मान्यवरांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉ.बालाजी कलेटवाड,संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माधव देशटवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप कॉ.अंकुश अंबुलगेकर यांनी केला. शेवटी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतमजूर युनिनच्या अंबुलगा गाव कमिटीचे कॉ.पंढरी देशटवाड, कॉ. पार्वती माळी, कॉ. रामराव यामावाड, शिवाजी मंत्रे, कॉ.आमिर कुरेशी, कॉ. विठ्ठल पांढरे, प्रदीप गुळवे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी संघटना SFI युवक संघटना DYFI चे कार्यकर्ते कॉ. शंकर बादावाड, कॉ.गंगाधर मांजरमे, कॉ. सुधाकर कांबळे, कॉ. हरीश देशटवाड, कॉ. माधव बादावाड, , कॉ.भीमराव सोनकांबळे, कॉ. शंकर येरगे, आदिनाथ कापसे यांच्यासह आनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. शेतमजूर युनियनच्या जिल्हा समितीच्या वतीने या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *